थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra Winter Session) महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चार मोर्चे धडकणार असून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळत असून विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे.
शहराच्या चारही भागातून येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून वाहतुकीला फटका बसणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मोर्चेकरांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी पोलिसांनी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून हे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये यशवंत स्टेडियम येथे विविध संघटनाचे 15 धरणे आंदोलन आणि आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी दोघांनी आत्मदहनाचा इशारा दिला असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 4 मोर्चे धडकणार
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात
CCTV कॅमेरा, ड्रोन कॅमेऱ्याची असणार मोर्चेकऱ्यांवर नजर