महाराष्ट्र

बसमध्ये सापडलेले 5 हजार केले परत; चालक-वाहकांचा प्रामाणिकपणा

5 हजार 300 रुपये असलेली पिशवी हरवली. चालक-वाहकांनी प्रामाणिकपणा दाखवत महिलेला पैसे परत केल्याचे समोर आले.

Published by : Dhanshree Shintre

सुरेश वायभट | पैठण | पैठण आगाराच्या पैठण पाचोड बसमध्ये प्रवास करत असलेली महिली घाई गडबडीत 5 हजार 300 रुपये असलेल्या पॉकेट बसमध्येच विसरले होते. चालक-वाहकांनी प्रामाणिकपणा दाखवत महिलेला पैसे परत केल्याचे समोर आल्यानंतर चालक-वाहकाचे सर्व स्तरावरूण कौतुक केले जात आहे.

श्रीमती भुकेले थेरगावला राहणारे, तालुका पैठण ह्या सोमवारी पैठण पाचोड बसने पैठणला येत असताना त्यांच्या जवळीक पाच हजार रुपये ठेवलेली पिशवी त्या बसमध्ये विसरल्या सदर पिशवी वाहक शंकर परांगे यांना मिळून आली. त्यांनी तात्काळ सापडलेली पिशवी डेपोमध्ये जमा केली.

काही वेळातच सदरची महिला डेपोत आली आणि चौकशी करू लागली. खात्री पटल्यानंतर वाहक शंकर परांगे आणि चालक संजय घुले यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलवून सदरची पिशवी परत केली. 5 हजार 300 रुपये असलेली पिशवी हरवली आणि ती परत मिळाल्यानंतर महिलेच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले. महिला आनंदीत झाल्याचे बघून बस कर्मचाऱ्यांना समाधान वाटले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा