महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त; स. प. महाविद्यालय ताब्यात

संपूर्ण दौऱ्यातील ठिकाणाची पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एसपीजीच्या पथकाने शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुणे दौऱ्यावर येत असून या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी मुख्य कार्यक्रमाचे ठिकाणी असलेल्या स. प. महाविद्यालयाचा ताबा घेतला आहे. शनिवारी संपूर्ण दौऱ्यातील ठिकाणाची पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एसपीजीच्या (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) पथकाने शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटनदेखील होणार आहे. एसपीजीच्या पथकाने पंतप्रधान उतरणार असलेले हेलीपॅड, त्यांचे कार्यक्रम होणारी ठिकाणे, त्याचबरोबर त्यांचा ताफा जाणारे रस्ते याची पाहणी केली. मोदी यांचा हा एकदिवसीय दौरा असणार असून विमानाने ते लोहगाव येथील हवाई दलाच्या टेक्नीकल एअरपोर्ट येथे येतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने शिवाजीनगर (सिंचननगर) येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर पोहचतील. पुढे ते वाहनाने रस्तेमार्गे सर्व नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

एसआरपीएफ, फोर्सवनची पथके तैनात

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी शहरात राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) तीन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर फोर्स वनची पथके देखील सुरक्षेसाठी असणार आहेत. रस्ते बंदोबस्त आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना तैनात करण्यात येणार आहे. तर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजीचे जवान असणार आहेत.

दरम्यान, दहशतवादी कृत्य करण्याच्या इराद्याने पुण्यात वास्तव्य करीत असलेल्या दोघा दहशतवाद्यांना पोलिसांनी नुकतेच पकडले. त्याचवेळी एनआयएने डॉ. अलनान अली सरकार यालाही अटक केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या दौऱ्यात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय