महाराष्ट्र

राज्यात 608 ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा; आज मतदान

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींसाठी आज निवडणुक सुरु झाली आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदासाठीच्या या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. यात नंदुरबार जिल्ह्यामधील 139 तर यवतमाळ जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीचा निकाल 19 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

यवतमाळमध्ये सकाळी साडेसात वाजेपासून ग्रामपंचायत मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 72 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. 70 सरपंचपदासाठी 261 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. तर, ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 1 हजार 31 उमेदवार नशिब अजामवत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे.

वाशिमच्या कारंजा तालुक्यामधील काजळेश्वर, वाई, किन्ही (रोकडे) व धनज या ग्रामपंचायत करिता आज मतदान होत असून सकाळपासून मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली आहे..या चार ग्रामपंचायतच्या मतदानासाठी निवडणुकीत एकून ८१०५ मतदार आहेत. यामध्ये ३७२५ पुरुष मतदारांचा आणि ४३८० महिला मतदारांचा समावेश असून आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहे. चार गावातील चार सरपंच पदासाठी २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

अमरावती जिल्ह्यात उद्या ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत. पाच ग्रामपंचायत साठी 110 उमेदवार रिंगणात आहे,यंदा पुन्हा थेट जनतेतून सरपंच निवडून येणार असल्याने चुरस वाढली आहे. तर, नंदुरबार जिल्ह्यातील १४९ ग्रामपंचायत साठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती. दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १३९ ग्रामपंचायतसाठी आज सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून ग्रामीण भागात या निवडणुकीत मोठी चुरस पाहण्यास मिळत आहे

दरम्यान, सकाळ पासूनच मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी असा लढती पाहण्यास मिळत आहे. विशेषतः शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यात काट्याची टक्कर आहे. मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपला मतांचा जोगवा देतो आणि ग्रामपंचायत सत्ता कोणत्या पक्षाकडे जाते हे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या मतमोजणीतच कळणार आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...