महाराष्ट्र

राज्यात दिवसभरात 661 नवीन कोरोनाबाधित रूग्ण

Published by : Lokshahi News

राज्यात आज दिवसभरात 661 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत तर, 896 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर 10 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 64,58,045 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान राज्यातील रिकव्हरी रेट 97.6 टक्के इतका झाला आहे.

तसेच राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण 66,16,762 झाली आहे. तर राज्यात आजपर्यंत 140372 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12टक्के एवढा आहे. तसेच राज्यात 1,48,880 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 968 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. दरम्यान राज्यात एकूण 14,714 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर