Ambernath Robbery Team Lokshahi
महाराष्ट्र

'सेक्सटॉर्शन' रॅकेटमुळे नवी मुंबईत खळबळ, 72 वर्षांचा नागरिक अडकला जाळ्यात

सेक्सटॉर्शन रॅकेटमुळे नवी मुंबईमध्ये खळबळ माजली आहे. सीबीडी बेलापूरमधील 72 वर्षांचा ज्येष्ठ नागरिक सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

विकास मिरगने | नवी मुंबई : सेक्सटॉर्शन रॅकेटमुळे नवी मुंबईमध्ये खळबळ माजली आहे. सीबीडी बेलापूरमधील 72 वर्षांचा ज्येष्ठ नागरिक सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे.

आठवड्याभरापूर्वी या व्यक्तीला अज्ञात व्हिडिओ कॉल आला. या व्हिडिओ कॉलवरून महिलेकडून ज्येष्ठ नागरिकाला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सायबर चोरट्यांनी हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला आणि ज्येष्ठ नागरिकाला हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रकरण मिटवण्यासाठी घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने 1 लाख 27 हजार रुपये सायबर भामट्यांना दिले. पैसे दिल्यानंतरही या ज्येष्ठ नागरिकाकडे सायबर चोरट्यांनी वारंवार अधिकच्या पैशांची मागणी केली. त्यामुळे नागरिकाने सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?