महाराष्ट्र

84 दिव्यांगांनी सर केले सर्वोच्च कळसुबाई शिखर

महाराष्ट्राचे एवरेस्ट समजले जाणारे सर्वोच्च कळसुबाई शिखर राज्यातील 84 दिव्यांगांनी यशस्वी सर करून नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे.

Published by : Team Lokshahi

सुरेश वायभट, पैठण | महाराष्ट्राचे एवरेस्ट समजले जाणारे सर्वोच्च कळसुबाई शिखर राज्यातील 84 दिव्यांगांनी यशस्वी सर करून नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे. शिवुर्जा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे दरवर्षी सर्वोच्च कळसुबाई शिखरावर दिव्यांगांसाठी ऊर्जा मोहिमेचे आयोजन करण्यात येते. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत कळसुबाई शिखराच्या माथ्यावरून करून अनोख्या पद्धतीने थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा उपक्रम गेल्या बारा वर्षापासून सलग सुरू आहे. शिवुर्जा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गाडे हे स्वतः पोलिओग्रस्त दिव्यांग असून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना एकत्र करून हा अनोखा उपक्रम दरवर्षी साजरा करण्यात येतो.

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, बीड, अकोला, वर्धा, बुलढाणा, मुंबई, यवतमाळ, अमरावती, परभणी, सोलापूर, धाराशिव, सातारा, जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, हिंगोली या जिल्ह्यातील दिव्यांग कळसुबाई शिखर पायथ्याच्या बारी गावात 31 डिसेंबर रोजी सकाळी एकत्र झाले. दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष शिखर चढायला सुरुवात केली. खाच खळगे, डोंगर कपारी, घनदाट जंगल, दगड-धोंडे, काट्या कपाट्या ,लोखंडी शिड्या, निसरड्या वाटा या सर्व अडचणीला सामोरे जात व एकमेकांना आधार देत अवघ्या चार तासांत ही सर्व दिव्यांग मंडळी कळसुबाई शिखर माथ्यावर अंधार पडण्यापूर्वीच पोहोचली.

रात्रीच्या अंधारात व कडाक्याच्या थंडीत या सर्व ८४ दिव्यांगांनी रात्रीचा मुक्काम कापडी तंबूत शिखर माथ्यावरच केला. एक जानेवारी रोजी भल्या पहाटे उठून शिखर माथ्यावरील सर्वोच्च कळसुबाई मंदिरापासून नवीन वर्षाच्या उगवत्या नवसुर्याचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. दिव्यांग क्षेत्रात सर्वोच्च कार्य करणाऱ्या 12 दिग्गज दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग ऊर्जा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मोहीम यशस्वी करण्यासाठी शिवाजी गाडे, कचरू चांभारे, सागर बोडके ,जगन्नाथ चौरे, जीवन टोपे, सुनील वानखेडे, उमेश खापरे, कल्याण घोलप, अंजली प्रधान, मच्छिंद्र थोरात, लक्ष्मण वाघे, अनिता जंबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारे मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर