महाराष्ट्र

धक्कादायक! दारूच्या नशेत मित्रानेच केली मित्राची हत्या

दारू पार्टीमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्याने एका मित्राने मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्याण : दारू पार्टीमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्याने एका मित्राने मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पूर्व आडीवली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याचे समजत आहे. वाजिद सय्यद असं मयत तरुणाचं नाव असून याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी परेश शीलकर या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

माहितीनुसार, मलंग रोड परिसरात राहणारा परेश शिलकर आणि वाजिद सय्यद हे पार्टनरशिपमध्ये चायनीजची गाडी सुरु करणार होते. दोघांची तयारी झाली होती, काही दिवसातच त्यांचे चायनीज सेंटर सुरू होणार होते. यामुळे वाजिद सय्यद आणि परेश शिलकर व त्याच्या मित्रांनी अडवली परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीमध्ये पार्टीचे आयोजन केले होती. पार्टी चालू असताना वाजिद व परेशमध्ये वाद झाला. याच वादातून परेशने वाजिद सय्यद वर लोखंडी पत्र्याने हल्ला केला, त्यात वाजिदचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

धक्कादायक म्हणजे हल्ला केल्यानंतर परेशनेच कंट्रोल रूमला फोन करून या घटनेची माहिती दिली. मानपाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परेशला ताब्यात घेतले. या प्रकरणी मानपाडा पोलिस पुढील तपास करत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chamoli Nandanagar cloudburst : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटी; 5 जण बेपत्ता

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा