भिवंडी तालुक्यातील मानकोली इथं हरिहर कंपाउंड मधील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून धुराचे उंच लोट पसरत आहेत. केमिकलच्या गोदामाला आग लागली असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते तर आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.