थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Manikrao Kokate ) सदनिका गैरव्यवहार प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय देत शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा आणि 10 हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात आली आहे. माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला असून आता या खात्याचा पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणार आहे.
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारला असून राजीनाम्याचे पत्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता माणिकराव कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच होणार असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत क्रीडा व अल्पसंख्याक खाते अजित पवारांकडेच राहणार असून मंत्रिपद देताना अजित पवारांकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहती मिळत आहे.
सध्या इच्छुकांमधे माजी मंत्री अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता अजित पवार माजी मंत्र्यांना संधी देणार की नव्या चेहऱ्याला पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
माणिकराव कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच
निवडणुका संपेपर्यंत क्रीडा व अल्पसंख्याक खाते अजित पवारांकडेच राहणार
मंत्रिपद देताना अजित पवारांकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न होणार..