मकरसंक्रांत हा हिंदू धर्मातील आनंदाचा आणि नव्या सुरुवातीचा सण मानला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि घराघरात उत्साहाचे वातावरण असते. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो. काळे कपडे घालून, हळदीकुंकू आणि सुगड पूजन करत संक्रांत साजरी केली जाते.
संक्रांतीला हलव्याचे दागिने घालण्याची खास परंपरा आहे. गोडवा आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून महिलांपासून लहान मुलांपर्यंत हे दागिने परिधान केले जातात. नवविवाहितांसाठी तर हा खास आकर्षणाचा भाग असतो. साखर, तीळ आणि साबुदाण्यापासून तयार केलेले हे दागिने सणाला वेगळीच रंगत आणतात.
हलव्याचे दागिने खरेदी करायचे असतील, तर ठाण्यातील ‘अनिता क्रिएशन’ हे ठिकाण विशेष लोकप्रिय आहे. गेली अनेक वर्षे येथे पारंपरिक तसेच आधुनिक डिझाईनचे दागिने तयार केले जातात. हलके, मिनिमल डिझाईनपासून ते खास हार, चोकर आणि लहान मुलांसाठी नाजूक दागिने येथे सहज मिळतात.
काळ्या साडीवर शोभतील असे मॉडर्न हलव्याचे दागिने, तसेच तुमच्या पसंतीनुसार बनवून देण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे. परवडणाऱ्या किमतीत सुंदर दागिने हवे असतील, तर यंदाच्या मकरसंक्रांतीला अनिता क्रिएशनला भेट देण्यास हरकत नाही.