बेळगावमध्ये होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाअधिवेशनाला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. तसेच त्याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
यावर आदित्य ठाकरे ट्विट करत म्हणाले की, बेळगावात होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाअधिवेशनाला कर्नाटक सरकारने परवानगी तर नाकारलीच, त्यावर बेळगावात संचारबंदीही लागू केली. सीमाही बंद केल्या जात आहेत. मराठी माणसांवरच्या ह्या अन्यायाचा तीव्र निषेध!
बेळगाव हा मराठी अस्मितेचा अविभाज्य भाग आहे आणि राहणारच. माझं कर्नाटकातल्या सरकारला आवाहन आहे की त्यांनी मराठी माणसांवरचा हा अन्याय तातडीने थांबवावा! महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितापेक्षा मोठं काहीही नाही! आणि केंद्र सरकारकडे देखील मागणी आहे की हा सर्व विवादित भाग तातडीने केंद्रशासित करावा. असे आदित्य ठाकरे म्हणाले.