महाराष्ट्र

‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पडणार नाय’

Published by : Lokshahi News

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी तब्बल एकाच दिवशी ७ सभा घेतल्या. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. गायक आनंद शिंदे यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी आनंद शिंदे यांनी गाण्याच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी 'हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पडणार नाय', असा टोला आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता लगावला.

काय म्हणाले होते फडणवीस?

एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का, असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, नंदेश्वर, डोंगरगाव व मंगळवेढा इथं भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आले असता त्यांनी हे विधान केलं होतं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...