बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray Matoshri ) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीची काल घोषणा झाली. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक दिवस राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काल अखेर ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली.
यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संवाद साधला. काल युती झाल्यानंतर मातोश्रीवर आज एबी फॉर्मचं वाटप होणार असून उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फॉर्मचं वाटप होणार आहे. उमेदवारांना आज सकाळी हे एबी फॉर्म देण्यात येणार आहेत.
Summary
मातोश्रीवर आज AB फॉर्मचं वाटप होणार
उद्धव ठाकरेंच्या हस्ते फॉर्मचं वाटप होणार
उमेदवारांना आज सकाळी एबी फॉर्म देण्यात येतील