महाराष्ट्र

Abhishek Ghosalkar: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; घोसाळकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार

ठाकरे गटाचे दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस याने स्वत:ला देखील गोळ्या झाडल्या. मॉरिसने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं. त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं. अभिषेक घोसाळकर यांचं बोलणं संपवून उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनंही स्वतःवर गोळी झाडून घेतल्या.

अभिषेक घोसाळकर यांचा मृतदेह जे जे रुग्णालयात काल रात्री शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. आज सकाळी 5.45 वाजता त्यांचं शव त्यांच्या निवासस्थानाकडे घेऊन गेले. आज अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद