Mumbai-Agra highway 
महाराष्ट्र

नवीन कसारा घाटात अपघात; सहा जण गंभीर जखमी

Published by : left

मुंबई -आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) नवीन कसारा घाटात (New Kasara Ghat) अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई -आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) नवीन कसारा घाटात (New Kasara Ghat) नाशिक हुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील इर्टीका गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. सदर गाडी समोरील जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवर आदळली. या दोन्ही गाड्यांचे मध्ये इर्टिका गाडी अडकल्याने त्या मधील 6 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन ग्रुप व महामार्ग पोलीस यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून अपघातग्रस्ताना मदत केली. त्यामुळे जखमींना उपचारासाठी कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा