महाराष्ट्र

Ahmednagar-Kalyan Highway: अहमदनगर कल्याण महामार्गावर माळशेज घाटाजवळ भीषण अपघात; आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Malshej Ghat: महामार्गावर माळशेज घाटाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Published by : Team Lokshahi

महामार्गावर माळशेज घाटाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ओतूरवरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकपने रिक्षा आणि ट्रकला धडक दिली. मृतांमध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेची सीसीटीव्ही दृश्य आता समोर आलेली आहेत.

मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे पती, पत्नी आणि दोन लहान मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. या अपघातातील मृतांची एकूण ची संख्या आठ आहे. यात पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. गणेश मस्करे ( वय 30), कोमल मस्करे ( वय 25 वर्ष ) हर्षद मस्करे (वय 4 वर्ष) काव्या मस्करे (वय 6 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील एकूण पाच लोकांची ओळख पटली असून तीन लोकांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. अन्य मृतांची नवे अद्याप समोर आली नसून या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

भाजीपाला घेऊन ओतूरहून कल्याणकडे जाणारा पीकअप आणि कल्याणकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. डिंगोरे- पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर नगर कल्याण हायवे रोडजवळ असणाऱ्या पेट्रोलपंपा समोर ही घटना घडली आहे. रिक्षा ओतूरकडे जात असताना समोरुन येणाऱ्या पिकअपने रिक्षाला धडक मारली. या धडकेत रिक्षामधील चालक आणि दोन प्रवासी यांचा मृत्यू झाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Wari 2025 : आषाढीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य