महाराष्ट्र

नवले पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव टँकरची ४८ वाहनांना धडक, 40 जण जखमी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | धायरी/सिंहगड : पुण्यात विचित्र अपघात झाला आहे. नवले पूल येथे अपघाताची मालिका अद्यापही सुरू असून आज पुन्हा कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यात सुमारे 48 गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर 48 गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ आदळला. यात सुमारे ४० ते ५० जण जखमी झाले आहेत. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. अपघातस्थळी अग्निशामक दल, सिंहगड तसेच दत्तवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झाले आहेत. सुमारे १२ ते १५ रुग्णवाहिका देखील अपघातस्थळी आलेल्या आहेत. अपघात इतका भीषण होता की 48 गाड्या एकमेकांवर आदळल्या. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाताना सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. परिणामी, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालेली आहे.

नवले ब्रिजवर अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, पुण्याच आजचा अपघात वार ठरला असून नवले ब्रिजच्या घटनेनंतर स्वामी नारायण मंदिराजवळ दुसरा भीषण अपघात झाला आहे. एका टेम्पोने सात गाड्यांना उडवल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात एकाचाही मृत्यू नाही.

शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला

Rahul Shewale: 'कॉंग्रेसच्या विचारांचा पराभव करायचायं' अर्ज दाखल करण्यापूर्वी शेवाळेंची प्रतिक्रिया