थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Banjara Samaj Protest) हैदराबाद गॅझेटनुसारनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून बंजारा समाजाने सातत्याने आंदोलन केले. या मागणीसाठी विविध ठिकाणी मोठे मोर्चे काढण्यात आले होते.
महाराष्ट्र सरकारने हिवाळी अधिवेशन व नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांचा कालावधी यासाठी दिला होता मात्र हा कालावधी संपूनही अद्याप निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर 18 जानेवारी रोजी संभाजीनगर येथील संत सेवालाल महाराज मंदिरात बंजारा समाजाची बैठक झाली.
या बैठकीत सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summary
बंजारा समाजाचा इशारा
18 जानेवारी रोजी संभाजीनगर येथील संत सेवालाल महाराज मंदिरात बंजारा समाजाची बैठक झाली
ST आरक्षणावर निर्णय नाही तर आझाद मैदानावर मोठे आंदोलन