महाराष्ट्र

आरोपी अविनाश भोसलेंचा जेलऐवजी 10 महिने हॉस्पिटलमध्ये मुक्काम

कैद्यांच्या हॉस्पिटलमधील मुक्कामाचा प्रश्न समोर आला आहे.

Published by : Team Lokshahi

कैद्यांच्या हॉस्पिटलमधील मुक्कामाचा प्रश्न समोर आला आहे. यावरुन अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. यातच आता एक नवी माहिती समोर येत आहे ती म्हणजे मुंबईतही प्रसिद्ध उद्योगपती आणि डीएचएफएल-येस बँक घोटाळ्यातले आरोपी अविनाश भोसलेंबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भोसलेंच्या मुक्कामाचा खुलासा 'माय महानगर'कडून करण्यात आला आहे.

अविनाश भोसले गेल्या दहा महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये मुक्काम ठोकून आहेत. जेजे हॉस्पिटलमध्ये सात महिने आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या आजारांची कारणं सांगून अविनाश भोसले हॉस्पिटलमध्ये मुक्काम ठोकून असल्याची माहिती मिळत आहे. आता भोसले सेंट जॉर्ज रुग्णालयातील नर्सिंग होमच्या स्पेशल वॉर्डमध्ये उपचार घेत असल्याचे समजते.

अविनाश भोसले खरंच आजारी?

अविनाश भोसले डीएचएफएल-येस बँक घोटाळ्यातले आरोपी

भोसलेंना ह्रदयविकार, फुफ्फुस, किडनीचा आजार असल्याचा दावा

7 महिने जेजे हॉस्पिटलमधील एसी वॉर्डमध्ये उपचार

जेजेतील कैदी वॉर्डऐवजी स्पेशल वॉर्डात आराम

3 महिन्यांपासून सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार

सेंट जॉर्जमध्ये नर्सिंग होमच्या स्पेशल वॉर्डमध्ये मुक्काम

हॉस्पिटलबाहेर भोसलेंसाठी एक कार उपलब्ध

कारमध्ये अविनाश भोसले कुटुंबाला भेट असल्याचा आरोप

भोसले त्याच कारमध्ये बिझनेस मिटिंग करत असल्याचा दावा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?