महाराष्ट्र

यवतमाळमध्ये तब्बल 7 वर्ष आरोपीचा महिलेवर अत्याचार

Published by : Lokshahi News

संजय राठोड, यवतमाळ | गुंगीचे औषधी देऊन महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशाल शेंडे असे आरोपीचे नाव असून, तो महिलेच्या घराशेजारी राहतो.

एक दिवस आई घरी बोलवत असल्याचा बहाणा करून त्याने महिलेला घरी बोलावले.चहातून गुंगीचे औषध देत महिलेचे अश्लील फोटो काढले. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेचे शोषण करीत होता.तब्बल सात वर्षापासून आरोपी महिलेवर अत्याचार करीत होता. बदनामीच्या भीतीने महिला हा जाच सहन करित होती. त्रास असह्य झाल्याने महिलेने आरोपी विरोधात अवधूतवाडी पोलिसात तक्रार दिली. विशाल शेंडे असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath Shidne : पुण्यात 'जय गुजरात' घोषणेवरून वाद; शिंदे गटाचं स्पष्टीकरण आलं समोर

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून