थोडक्यात
खासगी बसचालकांनी तिकिटामध्ये मोठी वाढ केल्याचे पाहायला मिळत आहे
ऐन दिवाळीत प्रवासी भाडे दुप्पट करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स चालकावर आजपासून कारवाई केली जाणार
आरटीओ कार्यालयाकडून आजपासून होणार कारवाई
(Private Bus Ticket) सणासुदीच्या निमित्ताने अनेक जण गावी जातात, फिरायला जातात. मात्र सणासुदीच्या काळात खासगी बसचालकांनी तिकिटामध्ये मोठी वाढ केल्याचे पाहायला मिळते. अनेकजणांना हा तिकिटाचा दर परवडणारा नाही. या वाढत्या तिकीट दराबाबत आरटीओकडे तक्रारीदेखील येत असल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता जादा तिकीट दर आकारले तर बस चालकांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ऐन दिवाळीत प्रवासी भाडे दुप्पट करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स चालकावर आजपासून कारवाई केली जाणार आहे.
प्रवाशांची लूट करणाऱ्या या कृतीविरोधात आरटीओ कार्यालयाकडून आजपासून कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नागपूर पुणे 1 हजार ते 2 हजार राहणारे भाडे दिवाळीच्या काळात 4 ते 5 हजार रुपयांपर्यंत गेल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे नागरिकांना जास्त भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. दिवाळीनिमित प्रवाश्यांकडून तिकिटाचे आरक्षण सुरू असतानाच परिवहन खात्याने ट्रॅव्हल्सची तपासणी करणे आवश्यक होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आता आरटीओ काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचे आहे.