महाराष्ट्र

Beed: शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार राजेभाऊ फड यांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक

शरद पवारांनी परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिल्याने राजेभाऊ फड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, बॅनर फाडले.

Published by : shweta walge

शरद पवारांनी परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करताच इच्छुक आणि संभाव्य उमेदवार राजेभाऊ फड यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राजेभाऊ फड यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले शरद पवारांचे आणि पक्षाचे बॅनर संतप्त कार्यकर्त्यांनी फाडून टाकले आहेत.

परळी विधानसभा मतदारसंघातून राजेभाऊ फड हे इच्छुक आणि संभाव्य उमेदवार होते. त्यामुळे त्यांनी तशी तयारी देखील केली होती. मागील पंधरा दिवसांपासून ते शरद पवारांच्या भेटी घेत आहेत. बैठकी देखील होत आहेत. मात्र आज शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख हे मराठा कार्ड देऊन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान राजेभाऊ फड यांनी उमेदवारी न मिळाल्यास दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करेल असे सांगितले होते. मात्र फड यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष अटळ झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जालन्यात बंजारा समाजाचा मोर्चा

Satara News : आश्चर्यचकित! साताऱ्यातील एका मातेने दिला ७ मुलांना जन्म, नेमकं प्रकरण काय?

Beed Heavy Rain : बीडमध्ये पावसाचा कहर; अनेक गावांचा संपर्क तुटला

Income Tax Return Filing : ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस; अंतिम तारीख चुकल्यास...