महाराष्ट्र

कोरोना नसतानाही दिला रेमडेसिविरचा अतिरिक्त डोस; रुग्णावर ओढावला मृत्यू

Published by : Lokshahi News

जालना जिल्ह्यात कोरोनाची लागण झाली नसताना देखील पैशाच्या लालसेपोटी खासगी हॉस्पिटलने एका रुग्णाला रेमडेसिविरचे अतिरीक्त डोस दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बाबुराव शेळके (42) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी यमुनाबाई शेळके या महिलेने रुग्णालया विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

जालन्यातील कुकडी गावच्या यमुनाबाई शेळके या महिलेने मृत पती बाबुराव शेळके (42) यांना कोरोनाचे कोणतेही लक्षणं नसताना पैशाच्या लालसेपोटी खाजगी हॉस्पिटलने त्यांना रेमडेसिविरचे अतिरीक्त डोस देऊन पतीची हत्या केल्याची आरोप केला आहे.

महिलेच्या आरोपानुसार 2 मे रोजी भोकरदन तालुक्यातील कुकडी येथील बाबुराव शेळके यांना गळ्याचा त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांना भोकरदन येथील अमर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.मात्र सिटीस्कॅन करण्यासाठी त्यांना सिल्लोड येथील अमर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. या रुग्णालयात रुग्णाचा सिटी स्कॅन चाचणी करण्यात आली.पण अहवालात त्यांना कोरोना नसल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पुन्हा रुग्णाला भोकरदन येथील अमर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं असता त्यांना रेमडेसिवीरचे दोन इंजेक्शन देण्यात आले. मात्र रुग्णाची तब्येत खालावल्याने त्यांना दुसऱ्यांदा सिल्लोड येथील अमर हॉस्पिटलमध्ये नेऊन रेमडेसिवीर इंजेक्शनचा एक डोस असे एकूण तीन डोस देण्यात आले.

हे तीन रेमडेसिवीर इंजेक्शन अमर हॉस्पिटलने 75 हजारांत रुग्णासाठी उपलब्ध करून दिले.मात्र तरीही रुग्णाची तब्येत खालावत असल्यानं सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात शेळके यांची अँटीजन चाचणी करण्यात आली.या चाचणीत देखील शेळके यांना कोरोनाची बाधा नसल्याचं समोर आलं.तिसऱ्यांदा शेळके यांना सिल्लोड येथील अमर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं असता त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याचा बहाणा करत हॉस्पिटलने पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथे नेण्याचा सल्ला दिला. मात्र औरंगाबादमधील साई कोव्हिड सेंटरमध्ये ऑक्सिजन पातळी खालावल्याने बाबुराव शेळके यांचा 13 मे रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान याप्रकरणी भोकरदन आणि सिल्लोड येथील अमर हॉस्पिटलच्या संचालक मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून हॉस्पिटल सिल करण्याची मागणी यमुनाबाई शेळके यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे. या तक्रारीची जिल्हा शल्य चिकित्सकांनी तातडीने दखल घेत या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करत चौकशीचे आदेश दिलेत.या समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केल्या जाईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलीय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा