मंगेश जोशी | जळगाव | राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार एसटी प्रशासनाने आता प्रशिक्षणार्थी एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून एसटी बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी बस चालवण्याच्या निर्णयावर तात्काळ अंमलबजावणी केली जात असून तब्बल 15 दिवसानंतर जळगाव एसटी आगारातून पोलीस बंदोबस्तात लाल परी बस आगारातून बाहेर पडली आहे. जळगाव बस स्थानकात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करून, प्रमुख मार्गांवर ती एसटी बस सोडण्यात येत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी हे स्व:ता बस स्थानकावर परिस्थिती हाताळत असून याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे.