थोडक्यात
बच्चू कडूंना गिरीश महाजांचा फोन
फोनवरुन बच्चू कडूंचा संवाद
बावनकुळेनंतर बच्चू कडूंना गिरीश महाजनांचा फोन
( Chandrashekhar Bawankule) शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्याकडून ट्रॅक्टरसह लाँग मार्च काढण्यात आला आहे. नागपूर वर्धा महामार्गावर ट्रॅक्टरने चक्का जाम करण्यात आला. रात्री रस्त्यावर ठिकठिकाणी चुली पेटल्या. शेतकऱ्यांनी संपूर्ण संसार रस्त्यावर मांडल्याचे पाहायला मिळाले.
बच्चू कडू आंदोलनावर ठाम असून जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत हटणार नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.आज दुपारी 12 पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे जाम करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला असून नागपूर वर्धा महामार्गावर ठिय्या असून वाहतूक ठप्प आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत हटणार नाही असं म्हणत 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम आहे.
यातच चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंना फोन केला असून बच्चू कडू फोनवर म्हणाले की, आंदोलन सोडून आम्ही मुंबईला कसे काय येऊ शकतो? नागपूरला बैठक लावा. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला जायला येते. शेतकऱ्यांच्या मोर्चात यायला काय झालं? बावनकुळे साहेब तुम्ही सांगा कालचा मोर्चा लाखो लोक इकडं होते. आम्ही शेतकऱ्यांना सोडून आलो असतो तर आमचा संदेश काय राहिला असता. तुम्ही सांगा मोर्चेकरी प्रमुखच जर बैठकीला गेले असते संदेश काय गेला असता. मी मुख्यमंत्र्यांना मेसेज केला ते ओके म्हणाले. बैठकीसाठी आम्ही मुंबईला नाही येऊ शकत. हे आंदोलन सोडून मुंबईला कसं येऊ. बैठकीसाठी आम्ही तयार आहे. नागपूरला बैठक घ्या आम्ही नागपूरला येऊ. आम्ही 4-5 जण येण्यापेक्षा तुम्ही नागपूरला या ना. इथं या, इथं बैठक ठेवू. असे बच्चू कडू यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला.
गिरीशभाऊ आम्ही आंदोलन थांबवू शकत नाही, रोज शेतकरी मरतात ते थोडी योग्य आहे? तुम्ही नागपूरला येऊन बैठक घ्या. आम्ही मुंबईला नाही येऊ शकत. मुख्यमंत्र्यांना आम्ही आंदोलनस्थळी नाही बोलवत. उद्या इथे काही वातावरण चिघळलं तर त्याला कोण जबाबदार आहे. इथे शेतकऱ्यांना सांभाळणार कोण? स्थगित नाही होऊ शकत. असे बच्चू कडू गिरीश महाजन यांच्यासोबत फोनवर बोललं.