नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधील 3,500 कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात मजदूर संघ, स्टाफ युनियन, एससीएसटी मायनॉरीटीज असोसिएशन सहभागी झाल्या आहेत. करन्सी नोट प्रेसच्या नवनियुक्त व्यवस्थापकांचा मनमानी कारभाराविरोधात सर्व कामगार रस्त्यावर उतरल्याची माहिती आहे. त्यामुळे नाशिकच्या करन्सी नोट प्रेसच काम पूर्ण ठप्प झाले आहेत.
नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधील नवनियुक्त व्यवस्थापकाने मनमानी कारभार सूरू केला आहे. प्रेसमधील साडेतीन हजारवरील कामगार संख्या एक हजार झाली आहे तरीही व्यवस्थापक समाधानी नसल्याचा आरोप कामगार करत आहेत.तसेच जुनी मशिनरी, खराब कच्चा माल हे दोष दूर न करता कामगारांना जास्त उत्पादनाचे लक्ष्य दिले जातेय. जादा काम करूनही इन्सेटिव्हचे पैसे दिले जात नसल्याचाही गंभीर आरोप होतोय. ज्या कामात कामगार पारंगत आहे ते सोडून दुसरेच काम करण्यास सांगितले जात आहे.
करन्सी नोट प्रेसच्या नवनियुक्त व्यवस्थापकांने मनमानी कारभार सुरू केला आहे. या व्यवस्थापकांच्या मनमानी कारभाराविरोधात कामगार रस्त्यावर उतरले आहेत. तब्बल 3,500 कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मजदूर संघ, स्टाफ युनियन, एससीएसटी मायनारीटीज असोसिएशन आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान निलंबित कामगारांना त्वरित कामावर घेणे, पाच लाखांच्या नोट गहाळ प्रकरणी निलंबित कामगारांना त्वरित कामावर घ्यावे अशा कामगारांच्या या मागण्या आहेत.