थोडक्यात
देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो
अंबाबाई मंदिरात यंदा नवरात्रोत्सवात AI तंत्रज्ञानाचा वापर
120 सीसीटीव्ही कॅमेरासह ड्रोनची राहणार नजर
(Kolhapur Ambabai Temple) आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. सगळीकडे देवीची पूजा, आरती, गरबा अशा जल्लोषात नवरात्रीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो.
देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते. आज सकाळपासूनच अनेक भाविकांनी देवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिराबाहेर गर्दी केली आहे. अनेक मंदिरांना रोषणाई करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात यंदा नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
अंबाबाई मंदिराची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी पहिल्यांदाच AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून IIT भोपाळच्या मदतीने उभारलेल्या या प्रणालीमुळे भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन, रांग सुकर, तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संशयितांवर त्वरित लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
तसेच यंदा ड्रोन कॅमेराची ही नजर संपूर्ण मंदिर परिसरावरती राहणार आहे. AI तंत्रज्ञान मंदिरातील सर्व 120 CCTV कॅमेऱ्यांशी जोडले गेले आहे.