थोडक्यात
MCA च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
प्रसाद लाड यांची एमसीएच्या निवडणुकीतून माघार
शरद पवार- फडणवीसांच्या भेटीनंतर घडामोड
(Ajinkya Naik MCA President ) MCA मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. MCA च्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी येत्या 12 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे, मात्र त्याआधीच अध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली आहे.
भाजपचे नेते प्रसाद लाड यांनीदेखील अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता, पण त्यांनी ऐनवेळी आपला अर्ज मागे घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील झाली. यावेळी त्यांच्यात या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या सर्वांनी उमेदवारी अर्ज मागं घेतल्यानं अजिंक्य नाईक यांचा मार्ग मोकळा झाला असून आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार या पदांसाठी निवडणूक होणार आहे.