Ajit pawar  
महाराष्ट्र

Loudspeaker Controversy: अजित पवारांनी अंतिम भूमिकाच स्पष्ट केली,तर फक्त मशिदींवरीलच...

उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा.

Published by : left

राज्यात मशिदीवरील भोंगा हटवण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर दररोज विविध प्रतिक्रीया समोर येत आहेत. त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्या जर कुठला निर्णय घ्यायचं झालं, तर फक्त मशिदींवरचे भोंगे बंद होणार नाहीत”, असे विधान करत अजित पवार यांनी हिंदुच्या उत्सवात होणाऱ्या लाऊडस्पीकर बंधने येऊ शकतात असा इशारा दिला.

सांगलीत आयोजित एका सभेत बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) मशिदींवरील भोंग्याच्या विषयावर भाष्य केले. “उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाने सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत लाऊड स्पीकरला परवानगी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, दिवाळीचे असे १५ दिवस काढले आहेत. यातले ३ दिवस वेळ वाढवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी आहे. उद्या जर कुठला निर्णय घ्यायचं झालं, तर फक्त मशिदींवरचे भोंगे बंद होणार नाहीत”, तर तो इतरही कार्यक्रमांना लागू होईल, असं अजित पवार (Ajit Pawar) यावेळी म्हणाले.

“शिर्डीला साईबाबांची काकड आरती पहाटे ५ वाजता सुरू होते. उद्या त्यातही काही अडचणी येऊ शकतात. काही ठिकाणी प्रवचन, कीर्तन असतं. हरिनाम सप्ताह असतो. काही ठिकाणी वाघ्या-मुरळीचे कार्यक्रम चालू असतात”, असं अजित पवार यावेळी म्हणाले. त्यामुळे जर एखादी गोष्ट सर्वांच्या संमतीने न त्रास होता होत असेल, तर नवीन प्रश्न निर्माण करण्याचं कारण काय?” असा सवाल देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा