थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. प्रचाराला जोरदार सुरूवात करण्यात आली.
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज सांगलीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रचार सभा होणार आहे.
उमेदवाराच्या प्रचारासाठी मिरजेत जाहीर सभा होणार असून आज अजित पवार परभणी दौऱ्यावर देखील येणार आहेत. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार लातूर दौऱ्यावर येत आहेत.
Summary
आज सांगलीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रचार सभा
उमेदवाराच्या प्रचारासाठी मिरजेत जाहीर सभा
उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार लातूर दौऱ्यावर