थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar) नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांनंतर राज्यात पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होत आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारी रोजी चिन्हाचं वाटप होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार सज्ज झाल्याचे पाहायला मिळत असून आज सकाळपासून पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकत्र बैठक घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Summary
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांनंतर राज्यात पालिका निवडणुकांची रणधुमाळी
पुणे पालिकेसाठी अजित पवार सज्ज
आज सकाळपासूनच पदाधिकाऱ्यांसोबत बैठक