Ajit Pawar  Team Lokshahi
महाराष्ट्र

सध्या समाजात तेढ वाढवणे, दरी पाडण्याचे काम सुरू - अजित पवार

Published by : Shweta Chavan-Zagade

सध्या समाजात तेढ वाढवणे, दरी पाडण्याचं काम सुरू आहे. वास्तविक महागाई तसच इतर समाजिक प्रश्न याकडे लक्ष दिले पाहिजे, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वक्तव्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी टोला लगावला आहे.

नेते किंवा पक्ष बदनाम होईल असं काही कृत्य करु नका. नवीन आलेले आणि जुने असलेले कार्यकर्ते एकत्र काम करा. सुनील शेळके मावळमध्ये असताना मी त्यांना उमेदवारी जाहीर केली होती. मावळची जागा काही कारणास्तव जिंकता येत नव्हती. मात्र सुनिल शेळके यांच्या माध्यमातून जिंकता आली. उमेदवार कोणत्या जाती धर्माचा हे इथं पाहिलं जात नाही. आर आर पाटील यांचं उदाहरण आहे. ते सर्वसामान्य कुटुंबातील आलेले असताना त्याना गृहमंत्री पदापासून ते अनेक मोठं पद देण्यात आली, असंही पवार म्हणाले

अजित पवार (ajit pawar) म्हणाले की, निरोगी महाराष्ट्रचा संकल्प आपण आज करतोय. कोरोनामध्ये हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर किती महत्त्वाचे आहे हे जगाला कळलं. सगळ्या सहकाऱ्यांनी यामध्ये खूप चांगलं काम केलं. अलीकडच्या काळात सवयी लोकांच्या बदलल्या आहेत. आज सुद्धा मुंबईत काही रुग्ण आढळले आहेत. आपण काळजी घेऊन मास्क घातलं पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे, असं ते म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?