थोडक्यात
'दिपावलीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा'
आमदार संग्राम जगतापांचे हिंदू आक्रोश मोर्चात विधान
संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार
(Ajit Pawar) अजित पवार यांची राष्ट्रवादी संग्राम जगताप यांना नोटीस पाठवणार आहे. संग्राम जगताप यांनी करमाळा येथे मोर्चाला आवाहन करताना दिवाळीची खरेदी हिंदूंकडून करण्याची विनंती केली.दिपावली सणाच्या निमित्ताने खरेदी करत असताना आपल्या खरेदीतील नफा केवळ हिंदू माणसालाच झाला पाहिजे, अशाप्रकारची दिपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी. असे संग्राम जगताप म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, "संग्राम जगताप यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. एकदा पक्षाची ध्येयधोरणे ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही."
यासोबतच "मी तिथे एका कार्यक्रमाला गेलेलो तेव्हा ही त्याला सांगितले होते, तो म्हणाला की याच्यामध्ये सुधारणा करेन. पण ते सुधारणा करताना दिसत नाही. त्याच्यामुळे त्याची जी भूमिका आहे, त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही." असे अजित पवार म्हणाले.