थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar) महापालिका निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. यातच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती.
अजित पवार हे पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये काही नियोजित बैठकांसाठी उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिस्कटल्याची माहिती मिळत आहे. यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक बारामती हॉस्टेल मधून रवाना झाले आहेत.
कोणतेही पोलीस संरक्षण, पोलीस ताफा न घेता एकटे अजित पवार अचानक निघून गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अजित पवार नेमके गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Summery
पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून
पोलीस संरक्षण, पोलीस ताफा काहीही न घेता एकटे रवाना