थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar ) महापालिका निवडणुकांचा 16 जानेवारीला निकाल लागला. त्यानंतर आता अनेक पक्षाच्या अनेक बैठका होताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची आज बैठक घेणार आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांसोबत अजित पवार आज संवाद साधणार आहेत. दोन्ही शहरातील नगरसेवकांसोबत अजित पवार बैठक घेत सूचना देणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये ही बैठक होणार असून अजित पवार नगरसेवकांना कोणता कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचे आहे.
Summary
अजित पवार सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची घेणार बैठक
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांसोबत अजित पवार साधणार संवाद
अजित पवार देणार नगरसेवकांना कानमंत्र