महाराष्ट्र

Ajit Pawar : उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती.

Published by : shweta walge

बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती. त्याचे पडसाद काल ठाण्यात दिसून आले. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसैनिकांनी शेण फेकले होते. तसेच ठाकरे यांच्या ताफ्यातील काही गाड्यांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ फेकून मारले होते. यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

अजित पवार म्हणाले की,

राजकारणाचा स्तर हा दिवसेंदिवस ढासाळत चालला आहे. या सगळ्या संदर्भात मी ठरवलेलं आहे. मी जनसमान यात्रा सुरू केल्यापासून तुम्ही बघताय माझी भूमिका काय म्हणतोय मी, मी अस काय बोलतोय, मी माझ्या सभेमध्ये काय सांगतोय, हे आपण सगळेजण बघताय त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कधीच माग घडले नव्हतं जे आता घडतंय ते अक्षरशः महाराष्ट्राचा नावलौकिक खराब करणाऱ्या गोष्टी आहेत.

सर्व राजकीय पक्षांनी सत्ताधारी विरोधी पक्षाने सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे याच्याबद्दल विचार केला पाहिजे आणि ह्या ज्याच्याकडे ज्या ज्या पक्षांच्याकडनं किंवा त्या पक्षाच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या चुका होत आहेत त्या चुका ताबडतोब थांबवल्याच पाहिजे, असे आवाहन अजितदादांनी केले.

राज्यात एकाच पक्षाची सत्ता येईल, अशी सध्या राजकीय स्थिती नाही. 1995 पासून शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी सरकारं आली. एका पक्षाच्या हातात कधी राज्यात सत्ता आली नाही. ममता बॅनर्जी, स्टॅलिन, अरविंद केजरीवाल यांनी एकहाती सत्ता आणली आहे. पण राज्यात अशी स्थिती नाही. राज्यात एका पक्षाचे सरकार येईल अशी स्थिती नसल्याचे अजितदादांनी सांगितले.

मराठा आरक्षणावर अजित दादांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं आपलं स्पष्ट मंत असल्याचे अजितदादा म्हणाले. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती. त्याला काही पक्ष उपस्थित नव्हते. आता लोकसभा, राज्यसभेचे अधिवेशन संपणार आहे. सरकारने पुन्हा मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावावी. त्यात सर्वांची बाजू ऐकून घ्यावी. मराठा समाजावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेऊन निर्णय घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा