(Akkalkot Heavy Rainfall) गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.राज्यभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. यातच
अक्कलकोटमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अक्कलकोट तालुक्यातील बादोला ते बोरगाव देशमुख मार्ग पावसामुळे पाण्याखाली गेला असून ओढ्याच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. अक्कलकोट तालुक्यात दोन दिवसात 130 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी शिरले आहे. या मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून काही भागातील वाहतूक ठप्प झाली आहे.