महाराष्ट्र

Tokyo 2020 : ‘गोल्डन स्लॅम’चं नोव्हाकचं स्वप्न हुकलं; ज्वेरेवकडून पराभूत

Published by : Lokshahi News

गातील नंबर एकचा बॅडमिंटनपटू असणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा सेमीफायनलमध्ये पराभव झाला आहे. एलेक्जेंडर ज्वेरेवने 1-6, 6-3, 6-1 च्या फरकाने त्याला धूळ चारत विजय मिळवला. यामुळे 'गोल्डन स्लॅम'चं नोव्हाकचं स्वप्न तूटलं आहे.

जोकोविचने पहिल्या सेटमध्ये आक्रमक अंदाज दाखवत ज्वेरेववर 6-1 ने विजय मिळवला. ज्वेरेवला पुनरागमन करण्याची संधीच नोव्हाकने दिली नाही. पण दुसऱ्या सेटमध्ये ज्वेरेवने दमदार पुनरागमन केलं. दुसरा सेट 6-3 ने ज्वेरेवने खिशात घातला. त्यानंतर मात्र नोव्हाकला सामन्यात आघाडी घेण्याची संधीच ज्वेरेवने दिली नाही. शेवटचा सेटही ज्वेरेवने 6-1 ने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. ​या पराभवासोबतच जोकोविचच 'गोल्डन स्लॅम' पूर्ण करण्याचं स्वप्नही अधुरं राहिलं. फायनलच्या सामन्यात ज्वेरेवची टक्कर रशियाच्या केरन खाचानोव याच्यासोबत असणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा