थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Worli) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत.
आज संध्याकाळी 5.30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असून 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. अखेरच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच राहणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. यातच अनेक ठिकाणी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले आहेत. हेमांगी वरळीकरांच्या पतीने पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला असून अपक्ष उमेदवार आणि शिंदेंच्या शिवसेनेने हा आरोप केला असल्याची माहिती मिळत आहे. हेमांगी वरळीकर ठाकरेसेना प्रभाग क्र. 193च्या उमेदवार आहेत.
Summary
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात पैसे वाटपाचे आरोप
हेमांगी वरळीकरांच्या पतीने पैसे वाटल्याचा आरोप
अपक्ष उमेदवार आणि शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप