थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chhatrapati Sambhajinagar) 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
उद्या 16 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता मतदानाला सुरूवात झाली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांचे भाऊ उमेदवार राजेंद्र दानवे भडकले असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावर मंडप लावण्यावरून हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे.
'आमच्या लोकांना मंडप लाव दिला जात नाही मात्र भाजपाच्या लोकांना मंडप लावू दिला जातो, मागील निवडणुकीच्या वेळेसही मंडप हटवला होता मात्र भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांचा मंडप ठेवला जातो' असे म्हणत उमेदवार राजेंद्र दानवे भडकल्याचं पाहायला मिळत आहे.
Summary
छत्रपती संभाजीनगरात उमेदवार राजेंद्र दानवे मतदान केंद्रावर भडकले
अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे भडकले
मतदान केंद्रावर मंडप लावण्यावरून वाद