थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ambadas Danve) कालपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे. विरोधी पक्ष विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळेल तसेच विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर आता ऐन अधिवेशनच्या काळात अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओ ट्विट करत अंबादास दानवे म्हणाले की, 'या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!'
'जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?' असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारला सवाल केला आहे.
Summery
अंबादास दानवेंनी एक पैशांचा व्हिडीओ ट्वीट केलाय.
पैशांच्या गड्ड्यांसह कोणते आमदार आहेत?
अंबादास दानवे यांचा ट्विट करत सवाल