महाराष्ट्र

अंबानी स्फोटक प्रकरण ते अनिल देशमुख यांचा राजीनामा…संपूर्ण घटनाक्रम

Published by : Lokshahi News

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी कारमध्ये सापडेल्या स्फोटकापासून सुरु झालेलं प्रकरण, कारमालक मनसुख हिरेन यांच्या आत्महत्या प्रकरण ते पोलीस अधिकारी सचिन वाझेंन अटक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब. यानंतर राज्याच्या राजकारणात उडालेली खळबळ आणि आता अनिल देशमुख यांचा राजीनामा. या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम पाहुयात….

25 फेब्रुवारी अंबानींच्या घराबाहेरील सापडली स्फोटक

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ 25 फेब्रुवारी रोजी जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 वाजता ही कार ठेवण्यात आली होती.ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिटकडे देण्यात आला होता.

2 मार्च : मानसिक छळ होत असल्याचा हिरेन यांचा पत्रात आरोप

मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना 2 मार्चला पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी 'माझा मानसिक छळ होतोय' असा आरोप केलाय. मुंबई पोलिसांनी हिरेन यांनी पत्र लिहिल्याचं मान्य केलं आहे. या पत्रात क्राइम इंटेलिजन्स युनिटचे सचिन वाझे, पोलीस अधिकारी आणि काही पत्रकारांकडून छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे.

4 मार्च ; 'कांदिवली क्राइम ब्रांचच्या तावडे साहेबां'चा फोन

मनसुख हिरेन यांना शुक्रवारी 4 मार्चला संध्याकाळी आठ वाजता एक फोन आला.मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी हा फोन 'कांदिवली क्राइम ब्रांचच्या तावडे साहेबां'चा असल्याचा दावा प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.. त्यानंतर, 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचा फोन बंद झाल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. पण, ज्या फोनचा दावा कुटुंबाने केला आहे. ते 'तावडे' कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे.मुंबई क्राइम ब्रांचच्या कांदिवली युनिटमध्ये तावडे नावाचे अधिकारी नाहीत.

5 मार्चला हिरेन यांचा मृतदेह सापडला

मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ ठेवण्यात आलेली स्कॉर्पियो ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांची असल्याची माहिती मिळाली. दरम्यान हिरेन यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असताना शुक्रवारी 5 मार्चला सकाळी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात खाडीत आढळून आला.

8 मार्च हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटक प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था करणार आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने यासंदर्भात माहिती दिली आहे.मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएस करणार आहे. मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

13 मार्च सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली

भाजपाकडून सातत्यानं मुद्दा लावून धरण्यात आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांच्या बदलीची घोषणा केली होती. त्यामुळे मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली. वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली. सचिन वाझे यांना काल रात्री उशीरा एनआयएकडून अटक करण्यात आली.

17 मार्च परमबीर सिंह यांची उचलबांगडी

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन अखेर परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं. आता परमबीर सिंग यांच्या जागी महाराष्ट्राचे विद्यमान पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

20 मार्च परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब

परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर आज 20 मार्च रोजी लेटर बॉम्ब टाकून राज्यभर खळबळ उडवून दिली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून अनिल देशमुख यांनी वाझे यांना 100 कोटी रुपये वसुल करण्यासाठी टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप केला.

अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी याची माहिती दिली.ठाकरे सरकारमधील आणखी मंत्र्याने राजीनामा दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा