महाराष्ट्र

नवी मुंबईत मर्डर ए अंजाम, अनोळखी चार जणांनी एकाचा चाकूने भोसकून केला खून

नवी मुंबईतून धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईत चार अनोळखी जणांनी एका रुग्णवाहिका चालकाचा चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Published by : shweta walge

नवी मुंबईतील डी वाय पाटील रुग्णालयाच्या गेटवर रात्री सव्वा आठच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी एका रुग्णवाहिका चालकाचा चाकू भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांच्या तक्रारी प्रमाणे, रात्री सव्वा आठच्या सुमारास चार इसमांनी एका रुग्णवाहिका चालकाचा पोटात, मानेवर चाकूने वार करून खून केला असून मयत व्यक्तीच्या सोबत आणखी एकाला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र,दुसरा व्यक्ती वेळेवर रुग्णवाहिका पळविल्याने वाचला. घटनेचा तक्रारदार आणि सुदैवाने हल्ल्यातून वाचलेल्या ज्ञानेश्वर नाकाडे यांनी रुग्णवाहिका पळवून नेल्याने तो वाचला तर युवराज सिह याला आपला जीव गमावावा लागला.

पोलीस घटनेचा अधिक तपास करत असून,चारही आरोपी फरार असून,पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हल्ल्याचा मुख्य कारण काय आहे याबाबत आरोपी सापडल्यावरच कळू शकेल. मात्र केवळ सव्वा आठच्या सुमारास घडलेल्या आणि प्रसिद्ध डी वाय पाटील रुग्णालयाच्या आणि नागरिकांनी गजबजलेल्या गेटवर खुनी हल्ला झाल्याने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा