महाराष्ट्र

Ahmednagar Corona : संगमनेरमध्ये चोरट्याने कोरोना रुग्णासह अॅम्ब्युलन्स पळवली…

Published by : Lokshahi News

आदेश वाकळे, प्रतिनिधी, संगमनेर

अहमदनगर – संगमनेर तालुक्यातील घारगावातून कोरोना रुग्णसेवत असलेली रुग्णवाहिकाच चोराने पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

घारगाव येथील लक्ष्मी हॉटेल जवळ उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत एक कोरोना रुग्ण होता. त्याला उपचारासाठी नेण्यात येत होते. मात्र रुग्णवाहिकेचा चालक काही वेळासाठी बाहेर गेल्याचं पाहून चोरट्यांनी डाव साधला.

आरोपी वैभव सुभाष पांडे याने संधीचा फायदा घेत रुग्णवाहिका थेट घारगाव येथून संगमनेरच्या दिशेला पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही तासातच संगमनेर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. तसेच रुग्णवाहिका देखील ताब्यात घेण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर