थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Amit Thackeray) महापालिका निवडणुकांच्या मतदानानंतर काल मतमोजणी पार पडली आणि निकाल जाहीर झाले. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. 29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. राज ठाकरेंच्या पक्षाचे म्हणजेच मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत.
यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अमित ठाकरे यांनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे म्हणाले की, मराठी माणसासाठी आमचा लढा सुरुच राहील ! निकाल काहीही असो... खंत एकाच गोष्टीची वाटते की, माझ्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं, ते देण्यासाठी मला कदाचित अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण एक लक्षात ठेवा, माझं आणि तुमचं नातं फक्त एका 'बटणापुरतं' किंवा 'मतापुरतं कधीच नव्हतं.'
'राजकारणात जय-पराजय होतच असतो, पण माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि साथ दिली, ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे. माझा शब्द आहे तुम्हाला... सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक नेहमी धावून येतील. 'महाराष्ट्र' आणि 'मराठी' माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरुच राहील. खचून जाऊ नका... 'मराठी'ला आणि 'मराठी माणसाला' कधीच एकटं पडू देणार नाही... हा शब्द आहे ठाकरेंचा. असे अमित ठाकरे म्हणाले.
Summary
महापालिका निवडणुकीच्या निकालावर अमित ठाकरेंची पोस्ट
'सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक नेहमी धावून येतील'
'महाराष्ट्र' आणि 'मराठी' माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरुच राहील'