महाराष्ट्र

Amit Thackeray : अन् अमित ठाकरेंनी केला दादर ते अंबरनाथपर्यंत लोकलने प्रवास

Published by : Shweta Chavan-Zagade

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) हे सध्या राज्यातील विविध भागांचा दौरा करत आहेत. याचदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आज (22 जुलै) दादर ते अंबरनाथ असा लोकल ट्रेनने प्रवास केला. सध्या त्यांनी राज्यभरातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी महासंपर्क अभियान सुरू केले आहे. या निमित्त ते राज्यभरात विविध ठिकाणी दौरे करत आहेत. ते मंगळवार व बुधवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

दरम्यान अमित ठाकरे यांचा आज अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथे संवाद दौरा आहे. या दौऱ्यात ते विद्यार्थी, युवक-युवतींसोबत संवाद साधणार आहेत. तसंच अमित यांच्या या दौऱ्यावेळी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी मनसेत प्रवेश करणार आहेत. या दौऱ्यासाठी मुंबईतून निघाल्यानंतर अमित ठाकरे यांनी लोकलने अंबरनाथ गाठलं. लोकल हा खरंतर मुंबई आणि आसपासच्या शहरातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण लोकलच्या साहाय्याने चाकरमान्यांना आपल्या इच्छित स्थळी वेळेत पोहोचता येतं. याच मुंबई लोकलमधून अमित ठाकरे यांनी केलेला प्रवास आता चर्चेचा विषय ठरला आहे.

अमित ठाकरे यांचा असा आहे दौरा

- सकाळी ९ वाजता प्राचीन शिवमंदिर, अंबरनाथ येथे अभिषेक

- सकाळी १० वाजता रोटरी क्लब अंबरनाथ पूर्व येथे तरुणांशी संवाद आणि पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा

- दुपारी १२ वाजता बदलापूर घोरपडे चौक येथे आगमन (जेवणासाठी राखीव)

- दुपारी १ वाजता घोरपडे हॉल येथे तरुणांशी संवाद

- संध्याकाळी ५ वाजता उल्हासनगर जवाहर हॉटेलजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला भेट

- टाऊन हॉल येथे तरुणांशी संवाद

- संध्याकाळी विठ्ठलवाडी स्टेशनहून लोकलने मुंबईकडे रवाना

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Daily Horoscope 17 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना साडेसातीचाही होणार त्रास; पाहा तुमचे भविष्य