Supriya Sule - Amruta Fadnavis Team Lokshahi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी त्यांना ट्विटरवर…

“ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, असं ट्विट अमृता यांनी केलंय.

Published by : left

राज्यात भोग्याच्या मुद्यावरून राजकारण तापत चालले आहे. त्यात उत्तरप्रदेशमध्य़े योगी आदित्यनाथ सरकारने मशिदींवरील भोंगे उतरवण्यास सुरूवात केल्यानंतर राजकारण आणखीणच तापले आहे. त्यात या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी उडी घेत मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती. मुख्यमंत्र्यांवर केलेल्या या टीकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रत्युत्तर दिले.

राज्यामध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना तिथे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढलेत तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं निश्चित करण्यात आलंय. या निर्णयाचे पडसाद राज्यातही उमटले आणि आरोप-प्रत्योरोप सूरू झाले आहेत.

या वादात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नीने उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या टीका केलीय. अमृता (Amruta Fadnavis) यांनी केलेल्या या टीकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी तुम्हाला खरं सांगू मी नाही त्यांना ट्विटरवर फॉलो करत. मी मगाशी सांगितलं तसं मला इतकी कामं असतात की मला नाही माझ्या जबाबदाऱ्यांमधून बाकी काही करायला फारसा वेळ मिळतं,” असं उत्तर त्यांनी दिलं.ठाण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी ट्विटरवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. “ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, असं ट्विट अमृता यांनी केलंय. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र हा हॅशटॅग वापरला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा