akola  Team Lokshahi
महाराष्ट्र

मेहरून तलाव परिसरात रेस लावलेल्या कारने घेतला 11 वर्षीचा मुलाचा बळी

विक्रांत संतोष मिश्रा असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव

Published by : Sagar Pradhan

मंगेश जोशी | जळगाव : जळगाव मध्ये काही तरूणांच्या मज्यामस्तीमुळे एका निष्पाप मुलाचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला आहे. रेस लावलेल्या कारणे 11 वर्षीय मुलाला उडवल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील मेहरुन तलाव परिसरात घडला असून या घटनेत 11 वर्षीय विक्रांत संतोष मिश्रा याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मेहरून तलाव परिसरात असलेल्या ट्रॅक वर दोन कारची रेस सुरू होती. त्याचवेळी आपल्या काका सोबत ट्रॅकवर सायकल चालवण्यासाठी आलेल्या 11 वर्षीय विक्रांत संतोष मिश्रा या बालकाला रेस लावलेल्या भरधाव कारने उडवले. या घटनेत बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हा अपघात इतका भयंकर होता की, बालक हा चेंडू सारखा वर उडून खाली पडला. तर त्याची सायकल जाऊन झाडाला अडकली. सदर घटनेनंतर बालकास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान याप्रकरणी कार मधील तीन जणांना पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा