(Meenatai Thackeray Statue) मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे असलेल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. आज सकाळी ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे.
ही घटना लक्षात येताच शिवसैनिकांनी हा लाल रंग पुसला असून लवकरात लवकर त्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करा अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी आता साफसफाई करण्यात येत असून या घटनेनंतर पोलिसही या परिसरात दाखल झाले आहेत.
हा लाल रंग कुणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू असून या घटनेनंतर शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिकांनी गर्दी पाहायला मिळते आहे.